ताज्याघडामोडी

वॉचमनने मध्यरात्री काढले महिलांचे अश्लील व्हिडीओ

चंदिगढ येथील विद्यापीठाच्या वसतिगृहातील एमएमएस प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या वॉचमनने सोसायटीत राहणाऱ्याच महिलांचे मध्यरात्री अश्लील अवस्थेत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटणेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वॉचमनवर  कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी देवळाली पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरुण वॉचमनच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॅमरोड दस्तगिर बाबा रोड येथे एका सोसायटीत गेल्या दहा वर्षांपासून नंदलाल टिकाराम डांगी रखवालीचे काम करत आहेत.नंदलाल टिकाराम डांगी हा 28 वर्षाचा असून रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून महिलांचे चित्रीकरण करीत असल्याचे समोर आले.या प्रकरणी पीडित महिला आणि साक्षीदार महिलांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर देवळाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवळाली पोलिसांनी या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करत संशयित आरोपीला अटक केली आहे. आणि त्याचा मोबाईल फोन देखील जमा केला आहे .संशयित आरोपी नंदलाल टिकाराम डांगी याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या पथकाकडून अधिकचा तपास केला जाणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

7 days ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago