ताज्याघडामोडी

लॅपटॉप ऑर्डर केला पण फ्लिपकार्टने पाठवला कपडे धुण्याचा साबण, तक्रार केल्यावर कंपनीने दिले हे उत्तर

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर एका व्यक्तीला त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला धक्काच बसला.यानंतर जेव्हा त्याने कंपनीकडे तक्रार केली तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला, त्याला ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत कोणतीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला.

यशस्वी शर्मा हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग-बिलियन डे सेलवर आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला. मात्र, जेव्हा त्यांच्या वडिलांनी डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर घेतल्यानंतर पॅकेट उघडले तर त्यांना मोठा धक्का बसला.

कारण त्यामध्ये कपडे धुण्याचा साबून आला होता. यानंतर यशस्वी यांनी लिंक्डइनवर एका लांबलचक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी त्यांच्यासोबतची घटना शेअर केली आहे. त्यानी लिहिले की, मी फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते.

मात्र, वडिलांनी बॉक्स उघडला तेव्हा लॅपटॉपऐवजी साबणाचा बॉक्स सापडला. याबाबत त्यांनी फ्लिपकार्ट कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. यशस्‍वीने त्‍यांना डिलिव्‍हरीचे सीसीटीव्‍ही फुटेज असल्‍याचे सांगितले असल्याचेही सांगितले तरी कंपनीने ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत यशस्‍वी यांना नकार दिला.

डिलिव्हरी बॉयसमोर बॉक्स उघडायला हवा होता, ही चूक पीडित यशस्वीने मान्य केली आहे.ते पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांना फ्लिपकार्टच्या ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ याबाबत माहिती दिली नव्हती. पण ओटीपी घेताना डिलिव्हरी बॉयने हे सांगायला हवे होते. वडिलांना न कळवता तो ओटीपी देऊन निघून गेला. तो गेल्यानंतर वडिलांनी पॅकेज उघडले तेव्हा त्यात लॅपटॉपऐवजी कपडे धुण्याचा साबण निघाला.

जेव्हा त्यांनी कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्याने ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ चे कारण देत ‘नो रिटर्न आणि नो रिफंड’ असे स्पष्ट केले. त्यांंच्याकडे डिलिव्हरी आणि पॅकेज उघडण्याचे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज असूनही, कंपनीने ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

18 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago