ताज्याघडामोडी

पत्नीचे प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहिल्याने पतीची आत्महत्या; पत्नीच्या प्रियकराने दिली होती जीवे मारण्याची धमकी

पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे माहिती झाल्याने तो गावाकडून पुण्यात आला. तरीही तिचे प्रेमसंबंध चालूच राहिल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले.पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.गणेश मिनीनाथ घुले (वय २४, रा. नेरे दत्तवाडी, मुळ रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्यांची बहीण अनिता मिनीनाथ घुले (वय २५, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९१२/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याचा आश्विनी हिच्या बरोबर ७ जुलै २०२१ रोजी विवाह झाला होता. तो भांड्याचे दुकानात काम करीत होता. एक दोन वर्षे गावात राहिल्यानंतर जुलै २०२२ मध्ये तो आपली पत्नी आश्विनी हिला घेऊन आई वडिलांना काही एक न सांगता गावातून निघून पुण्यात राहण्यास गेला. फिर्यादी यांनी भावाला विचारल्यावर त्याने आपल्या पत्नीचे अजिंक्य घुले याच्याबरोबर प्रेमसंबंध असून तो गावात बदनामी करतो.

त्याला जाब विचारल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन पुण्यास राहण्यास आलो असे त्याने फिर्यादीला सांगितले होते. पुण्यात तो स्विग्गीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो पुण्यात आल्यावर अजिंक्यही पुण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता तो घरी आला. तेव्हा त्याची पत्नी व अजिंक्य हे एकाच रुममध्ये होते.

त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. अजिंक्य घुले याने त्याला मारहाण करुन तुझ्या बायकोबरोबर माझे संबंध राहणार. तुला काय करायचे ते कर.एक दिवस तुझा काटा काढून तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी जीवे मारण्याची धमकी त्याने गणेशला दिली.ही घटना फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी अजिंक्य घुले याला फोन करुन विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीचीउत्तरे दिली. फिर्यादी या पुण्यात आल्या. गणेश याच्या पत्नीला घेऊन फिर्यादी मुंबईला गेल्या.

दुसर्‍या दिवशी त्यांनी गणेश याला फोन केला असता तो उचलत नव्हता.त्यानंतर १९ सप्टेबर रोजी त्यांनी पुण्यातील एकाला गणेश फोन उचलत नसल्याचे सांगितले.तेव्हा तो गणेशच्या रुमवर गेला. गणेश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यांनी अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी फिर्याद दिली.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

23 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago