ताज्याघडामोडी

चौकीतच २० हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले

एका पोलीस नाईकाला २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीत रंगेहात पकडले. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीसचौकी नजीक घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोराला बेड्या ठोकल्या आहेत. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोरच नाव आहे.

लाचखोर भरत जगदाळे हा पडघा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर आहे. तो मुंबई-नाशिक महामार्गवरील तळवली नाका पोलीस चौकीत कार्यरत होता. त्याने २१ सप्टेंबर जून रोजी तक्रारदार यांना त्यांच्या ताब्यातील वाहनावर कारवाई न करण्यासाठी व त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० हजार रुपयांची मासिक हप्त्याची मागणी केली होती.

मात्र तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस चौकीनजीक सापळा रचला होता.

पहाटे अडीचच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून तळवली नाका पोलीस चौकीजवळ पंचांसमक्ष लाचखोर भरत जगदाळे याने २० हजार रुपयांची लाच घेताना त्याला पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी तो कार्यरत असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत ठेवले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago