ताज्याघडामोडी

जमिनीच्या वादातून विवाहितेसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जमिनीच्या वादातून घराला आग लावत विवाहितेसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हल्ल्लेखोराच्या टोळीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील वासुंद्री परिसरात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पाटील ( वय ३६) हे कल्याण तालुक्यातील टिटवाळा मार्गावरील वासुंद्री परिसरात पत्नी, व दोन मुलीसह राहतात. योगेश हे शहाड येथील सेंच्युरी रेयाॅन कंपनीत कामाला आहेत. योगेश आणि मांडा गावातील आरोपी लालचंद पाटीलसह बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू आहेत. आठ वर्षापूर्वी आरोपी पाटील बंधूंनी योगेशना बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे. त्यातच बुधवारी योगेश रात्रपाळी कामासाठी कंपनीत गेले.

त्यावेळी घरात त्यांची पत्नी व दोन लहान मुली होत्या. त्या दिवशी मध्यरात्री दीड वाजता घराच्या खिडकी जवळ बोलण्याचा आवाज आल्याने योगेशची पत्नी दीपाली हिने घरातील लाईट लावून पहिले असता, तिला खिडकीतून आरोपी लालचंद, बबलेश, नरेश, आशिष हे तेथून हातात ड्रम, बोळे घेऊन पळताना पाहिले. त्यांनीच घराची बाहेरून कडी लावत घरावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

खळबळजनक बाब म्हणजे घराला आग लावण्यापूर्वी आजुबाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांना आरोपींनी कड्या लावल्याने शेजारचे रहिवासी घरात कोंडून राहिले होते. तर आग लागल्याचे पाहून पत्नी दीपाली यांनी घरातून ओरडा केल्यानंतर परिसरातील काही रहिवासी रात्री दीड वाजता जागे झाले. त्यांना योगेश पाटील यांच्या घराला आणि घरासमोरील रिक्षेला आग लागल्याचे लक्षात आल्याने शेजाऱ्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरुन लावलेली कडी काढून तिला आणि तिच्या मुलींना सुखरुप बाहेर काढले.

पत्नी दीपाली व तिच्या आठ आणि दोन वर्षाच्या मुली धुराने कोंडून गुदमरल्या होत्या. जमिनीच्या वादातून आपल्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी योगेश यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago