ताज्याघडामोडी

विवाहितेची सहा महिन्याच्या चिमुकलीसह विहिरीत उडी, पोहता येत असल्याने स्वत: वाचली, पण चिमुकलीचा जीव गेला

करवीर तालुक्यातील वडणगे गावामध्ये विवाहितेने पोटच्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीजवळ असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने तिला वाचवण्यात यश आले.

पण सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. तनुजा चव्हाण असे त्या चिमुकलीचे नाव असून तिची आई मोनिका चव्हाणला वाचवण्यात यश आले.

या विवाहित महिलेने कोणत्या कारणावरून हे कृत्य केले याचे कारण समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार वडणगेमधील 6 महिन्यांच्या बालिकेसह विवाहितेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील चौगले मळ्यात लमान समाजातील परशुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत वडणगे येथे राहतात.

पहाटे साडेपाचच्या सुमारास परशुराम चव्हाण यांची पत्नी मोनिका आपल्या सहा महिन्यांच्या तनुजा या मुलीला सोबत घेत बाहेर पडली. घराजवळच असलेल्या विहिरीत तिने मुलीसह उडी घेतली. मात्र, विहिरीजवळ असलेल्या ग्रामस्थांना उडी घेताना दिसल्याने आरडाओरडा केला. त्यांनी मोनिका आणि बाळाला तातडीने बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले.

बाळाला वाचवण्यात यश आले नाही, पण मोनिकाला बाहेर काढण्यात यश आले. तिला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठावर आली. तिला ग्रामस्थांनी बाहेर काढले. घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांकडे झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

17 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago