ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून

पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या भावाचा अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे.

या प्रकरणी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. घटनेला वेगळं वळण मिळावं, म्हणून आरोपींनी अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाच्या कुटुंबियांना 20 कोटींची खंडणी मागितली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे  यांनी कौटुंबिक कारण पुढे करत मूळ कारण सांगण्यास नकार दिला आहे. सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गुरुवारी या 7 वर्षीय मुलाच राहत्या सोसायटीच्या पार्किंग मधून अपहरण झालं होतं. याबाबत खून झालेल्या मुलाच्या वडिलांनी पिंपरी पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. पिंपरी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकासह शेकडो पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, आरोपी मंथनच 7 वर्षीय मुलाच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे पुढे आलं आहे. तसेच दोन्ही कुटुंबात वाद झाले होते.

याच रागातून आरोपी मंथनने मित्र अनिकेतच्या मदतीने 7 वर्षीय मुलगा राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून अपहरण केलं तिथंच त्याच नाक आणि तोंड दाबून खून केला आहे. या अपहरणाचा कट गेल्या 10 दिवसांपासून रचला गेला होता. अपहरण करून खून करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह भोसरी MIDC परिसरातील पडक्या इमातीवरील टेरिसवर नेहून ठेवला.

दरम्यान, आरोपी मंथनच पोलिसांसह आरोपीचा शोध घेत होता. त्यांच्या तपासात तो अडथळे आणत होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले आणि साथीदारासह मंथनला अटक करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून त्याने खून केल्याची कबुली दिली, असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago