ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये मार्गदर्शन सत्र संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विभागात  इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल रोबोटिक्स’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात  मार्गदर्शक म्हणून स्वेरी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी व सीडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे ॲप्लिकेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अमर कचरे हे उपस्थित होते.

             प्रारंभी प्रास्ताविकात प्रा.धनराज डफळे यांनी या मार्गदर्शन सत्राचा हेतू स्पष्ट केला. स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट विभागातील ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात आणि यासाठी कोणकोणती तयारी केली जातेयाबाबत सविस्तर माहिती देऊन कंपनीमधील तज्ञांकडून घेतलेले मार्गदर्शन कसे उपयोगाचे ठरते यावर प्रकाश टाकला. तसेच शिक्षण आणि इंडस्ट्रीज या दोन्ही मधला दुवा म्हणजेच मार्गदर्शन सत्र’ असे सांगून  बहुमोल मार्गदर्शन केले. अभियंता कचरे यांनी पुढे रोबोटिक्स म्हणजे काय हे सांगून इंडस्ट्रियल रोबोटिक्स चे विविध प्रकाररोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रातील उपयोग सांगून रोबोट डिझाईनिंग आणि कंट्रोलिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर तसेच या क्षेत्रामध्ये असलेल्या नोकरीच्या विविध संधी यावर विचार व्यक्त केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. या मार्गदर्शन सत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे मार्गदर्शन सत्र यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले. मार्गदर्शन सत्राच्या समन्वयक प्रा.माधुरी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.विजय सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

17 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago