ताज्याघडामोडी

एटीएम मशीनमध्ये पैसे जमा करणास निघालेल्या गाडीचा चालक पैसे घेऊन पसार

२ कोटी ८० लाखावर डल्ला 

एटीएम मशीनमध्ये कॅश डीपोजीट करणाऱ्या कंपनीचा  वाहनचालक 2 कोटी 80 कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची घटना सोमवारी 5 सप्टेंबरला गोरेगांव येथे घडली आहे. कंपनीचे कर्मचारी एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी गेले असता वाहनचालक 2.80 कोटींनी भरलेले वाहन घेऊन फरार झाला. मुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी घटना घडताच व्हॅनच्या चालकाचा शोध सुरू केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील युनियन बँकेतकॅश भरणारी व्हॅन पैसे भरण्यासाठी पोहोचली असताना ही घटना घडली. कर्मचारी एटीएम मशीनमध्ये रोकड जमा करण्यात व्यस्त असताना उदय भान सिंग नावाचा चालक पैसे असलेल्या व्हॅनसह पळून गेला. हा वाहन चालक दोन महिन्यांपूर्वी कंपनीत चालक म्हणून रुजू झाला होता. एटीएम मशीनमध्ये कॅश डिपोझिट करायला गेलेले चालकाचे सहकारी कॅश व्हॅन ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी परतल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी जीपीएस ट्रॅकर तपासला.

गोरेगाव पश्चिमेतील पिरामल नगर परिसरात एका निर्जन ठिकाणावरून व्हॅनचा शोध घेऊन ती जप्त करण्यात पोलिसांना यश आले. परंतु चालक अद्याप फरार आहे. आरोपींनी 2.80 कोटी रुपयांची रोकड पळवल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago