ताज्याघडामोडी

मैत्रीला नकार दिल्याने महिला अकाउंटंटवर अ‍ॅसिड हल्ला

आरोपीने पोलिसांच्या चौकशीत खुलासा केला की, त्याला लेखपाल महिलेशी मैत्री करायची होती. तर लेखपाल महिला प्रत्येक वेळी त्याला नकार देत असे. त्यामुळे आरोपी नरेश याने रागाच्या भरात तिचा चेहरा अ‍ॅसिडने जाळण्याचा निर्धार केला होता. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी नरेशला तुरुंगात पाठवले.

एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची मैत्री नाकारण्याची मोठी किंमत महिलेला चुकवावी लागली आहे. संतापलेल्या आरोपीने त्या महिलेल्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. जखमी महिला ही लेखपाल असून आरोपीचे नाव नरेश उर्फ दिनेश कुमार आहे. 

शाहगंज पोलिस स्टेशन परिसरात राहणारी महिला लेखपाल हीने दिलेल्या माहितीनुसार, ती महिला २ सप्टेंबर २०२२ रोजी तहसील ड्युटीवर जात होती. वाटेत मालपुरा पोलीस ठाण्याच्या कराहारा गावातील नरेश उर्फ ​​दिनेश कुमार याने तिला अडवून तिचा विनयभंग केला. विरोध केल्यावर आरोपी नरेश याने अ‍ॅसिड हल्ला केला. ज्यामध्ये ती थोडक्यात बचावली.

मोबाईलवरच अ‍ॅसिडचे काही थेंब पडले. नरेशच्या खोडसाळपणामुळे ती लेखपाल घाबरली आणि तिने ड्युटीवर जाणे बंद केले. शाहगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक जसवीर सिंह सिरोही यांनी सांगितले की, आरोपी नरेशला रविवारी पाथोली कालवा परिसरातून अटक करण्यात आली आहे. महिला लेखापालाने त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये तो यापूर्वीही तुरुंगात गेला होता. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago