ताज्याघडामोडी

करुणा मुंडे विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करुणा मुंडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात अहमदनगर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतंत्र राजकीय पक्ष काढला आहे. त्या राजकीय क्षेत्रात हात पाय मारत असतानाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे.

करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच फिर्याद दिली होती की, संगमनेर येथील एका कार्यकर्त्याने त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, आता याच कार्यकर्त्याने उलट तक्रार देत करुणा मुंडे यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या कार्यकर्त्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करुणा मुंडे यांनी क्षनिधीच्या नावाखाली माझी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

करुणा मुंडे यांनी शिवशक्ती नावाचा पक्ष स्थापन केल्याची घोषणा काही काळापूर्वीच केली होती. त्यांनी मधल्या काळात कोल्हापूर येथन निवडणूक लढविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रात हातपाय मारणाऱ्या करुणा मुंडे यांना सुरुवातीपासून विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. या अडचणींचा सामना करताना त्यांना तुरुंगाचीही हवा खावी लागली आहे. आता त्यांच्यावर थेट फसवणूकीचाच गुन्हा दाखल झाला आहे.

करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील भारत भोसले यांच्यासह तिघांविरुद्ध फिर्याद दिली होती. या फीर्यादीत त्यांनी म्हटले होते की, भारत भोसले यांच्यासह तिघांनी पक्षाला निधी मिळविण्यासाठी आणि नफा मिळवून देण्यासाठी त्यांच्या बांधकाम कंपनीत तब्बल 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या फिर्यादीनंतर आता उलट फिर्याद आल्याने प्रकरणातील दुसरी बाजूही पुढे आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago