ताज्याघडामोडी

कल्याणराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त्‍ सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न्‍

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण वसंतराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त्‍ वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त्‍ विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार  शिबिरआयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते व वसंतदादा मेडिकल फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे यांचे अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, दिनकर चव्हाण, भारत कोळेकर, विलास जगदाळे, राजाराम पाटील, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन महादेव देठे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी  पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे व कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांचे प्रमुख उपस्थित करण्यातआले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजनमान्यवरांचे शुभहस्ते करण्यातआले.

यावेळी सुमारे 400 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले. सदर रुग्णांवर कारखान्याच्या मेडिकल ऑफिसर डॉ.सौ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पीटलच्या डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे,डॉ. पंढरीनाथपाटील,डॉ. गिरीधर चलवाड ,व्यवस्थापक सद्दाम मनेरी या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केले. यावेळी वसंतदादा मेडिकल फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे मेडिकल ऑफिसर डॉ.सौ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पीटलच्या डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे,डॉ. पंढरीनाथ पाटील, डॉ.गिरीधरचलवाड, व्यवस्थापक सद्दाम मनेरी यांचे तसेच जनकल्याण हॉस्पीटलचे सर्व स्टाफ यांचे आभार कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी मानले.

            सदर प्रसंगी डॉ.सुधिर शिनगारे यांनी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त्‍ गोरगरिबाची सेवा घडावी या हेतुने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, कारखाना कार्यस्थळावरील व परिसरातील गोरगरिब गरजुना तसेच कामगारांना व त्यांचे कुंटुंबियांसाठी मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगुन, जनकल्याण हॉस्पीटलच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांची व हॉस्पीटलच्या वतीने विविध आजारावर करण्यात येत असलेल्या इलाजाची माहिती दिली.

यावेळी अनिल नागटिळक, सिध्देश्वर चव्हाण, कारखान्याचे डेप्यु.जन.मॅनेजरके.आर.कदम, टेक्निकल  जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, चिफइंजिनिअर एस.एन.औताडे, डिस्टीलरी मॅनेजरपी.डी.घोगरे, मुख्यशेती अधिकारी अे.व्ही.गुळमकर, चिफअकैंटंट बबन सोनवले, सिव्हिल इंजिनिअर एन.एम.काळे, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर कुंभार, हेडटाईम किपर संतोष काळे, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, सभासद, अधिकारी व कर्मचारी, प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago