ताज्याघडामोडी

प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपी जेरबंद

रायगड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब देखील उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

अलिबाग तालुक्यातील नवखार येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहित महिला गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होती. यामुळे, मांडवा पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास मुरूड तालुक्यातील गारंबीच्या जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला झुडपात एका महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला होता. 

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने तपास करण्यात आला. यावेळी या मृतदेहाच्या अंगावर लाकडाचे ओंडके ठेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. 

तपासादरम्यान अलिबाग तालुक्यातील मांडवा पोलीस ठाण्यात सदर महिला बेपता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून संशयित आरोपी सचिन थळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने पूनम हिची हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या माहितीनुसार मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

आरोपीने मनात राग धरून तिला मुरुडला आणून जीवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असं पोलिसांनी सांगितलं. दोघांमध्ये झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन थळे याला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी सचिन थळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे, एएसआय सचिन वाणी, सुरेश वाघमारे, सागर रोहेकर, विलास आंबेतकर, सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago