ताज्याघडामोडी

आ.शहाजीबापू पाटील म्हणजे बोलका बाहुला !

शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेची प्रतिक्रिया

‘त्या’ विधानाचा घेतला समाचार   

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचा केवळ बोलका बाहुला असून ५० खोक्याचे टॉनिक मिळाल्यामुळे आता ते राज्यभर आपले बोलक्या बाहुल्याचे प्रयोग सादर करीत करण्यासाठी फिरत आहेत,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल बोलण्याइतकी आमदार शहाजीबापू पाटील यांची राजकीय उंची नाही अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगोला मतदार संघातील १ हजार कोटींच्या विकास कामाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.अडीचशे कोटींच्या पहिल्या टप्प्यातील निधीच्या  मंजुरीस मान्यता दिली,आणि सहाच महिन्यापूर्वी इतका भरभरून निधी देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मी अजिबात नाराज नाही असे वक्तव्य करणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटलांनी नुकतेच माध्यमांसमोर बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबत केलेले वक्तव्य म्हणजे केवळ ५० खोक्याच्या बळावर आणलेले उसने अवसान आहे अशीही टीका संभाजी शिंदे यांनी केली आहे.   

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन रहावे, लोकांची कामे करावीत असे विधान आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्यानंतर शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून उद्धव साहेबांनी सांगोला मतदार संघातील विकास कामांना दिलेला शेकडो कोटींचा निधी आणि याबाबत स्वतः शहाजीबापू पाटील यांनी सहा महिन्यापूर्वी काढलेले कृतज्ञतेचे उद्गार आणि आता केलेली गद्दारी या दोन्ही गोष्टी सांगोला तालुक्यातील जनता विसरणार नाही अशीच प्रतिक्रिया शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.      

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

23 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago