ताज्याघडामोडी

पुणे जिल्ह्यात किळसवाणी घटना

६५ वर्षीय वृद्धाचा पाळलेल्या कुत्रीवर बलात्कार

आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना समोर आलेल्या आपण पहिल्या आहेत. मात्र, एका कुत्र्यावर अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलंय का? नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली आहे.

हा अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाइलमध्ये काढले आहेत. या प्रकरणी एका ६५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर रा. टाकळकरवाडी ता. खेड असे या विकृताचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात. या व्यक्तीने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे आमिष दाखवून घरामध्ये घेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. हा सगळा प्रकारचा स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.

याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ (अप्राकृतिक गुन्हे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.विकृती कुठल्या स्तराला चालली आहे, हे या घटनांवरून समोर येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

7 days ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago