ताज्याघडामोडी

युरिया लिंकींग करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा – स्वाभिमानी”ची कृषीमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – 

राज्यभरात रासायनिक खते व बी- बियाणे यांची टंचाई होते आहे, यामुळे शेतकरी सध्या हवालदिल आहे याच प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली आहे, 

या भेटीत राज्यातील शेतकर्‍यांना खत दुकानदारांकडून वेळेवर युरिया मिळत नाही,युरिया कमी प्रमाणात दिला जातो,युरिया घ्यायचा असेल तर सोबतच इतर खते बळजबरीने त्यांना खरेदी करण्यासाठी दुकानदार भाग पाडत आहेत, यामुळेच शेतकऱ्यांचे विनाकारण अधिकचे पैसे देखील जातात, आणि विशेष म्हणजे या युरिया लिंकींगच्या साखळीमध्ये कृषीविभागाचे अधिकारी देखील सामिल आहेत त्यामुळेच युरीया लिंकींग हे लोन सर्वत्र पसरले आहे. हे सर्व प्रश्न बागल यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणुन दिले.

युरिया खत लिंकींग मुळे सध्या शेतकर्‍यांना ऐन पावसाळ्यात खते मिळत नाहीत, पिकांच्या फळधारणा कालावधीतच जर खते मिळाली नाहीत तर राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पादन घटेल व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे बागल यांनी मंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले.

तसेच सध्या पावसाळा सुरू आहे अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे ती पुरेशी नाही त्यामध्ये वाढ करावी व एकही शेतकरी वंचित न ठेवता अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना मदत करावी अशी ही मागणी बागल यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्याकडे केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago