ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये ” यशस्वी उद्योजक कसे व्हावे ” याविषयावर व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या साठी यशस्वी उद्योजक कसे व्हावे याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यान सुरुवातीस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी श्री नंदकुमार दुपडे यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे डॉ बाळासाहेब गंधारे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्री नंदकुमार दूपडे म्हणाले नवीन उद्योजक व्यवसाय सुरू केल्या वर तो उद्योग कसा यशस्वी होईल या बद्दल विनोदी शैली मध्ये मार्गदर्शन केले व आपल्या उदोग मध्ये आपण ग्राहक बरो बर कसा सवाध कसा साधला पाहिजे या बद्दल महत्त्व पूर्ण माहिती दिली व नवीन उद्योजकांमध्ये जर पॅशन असेल तर तो उद्योजक यशस्वी होतोच अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांना साठी कम्प्युटर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपारमेंट इलेक्ट्रिकल डिपारमेंट या शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा.विक्रम भाकरे,प्रा.मनोज कोळी प्रा. स्वप्नील टाकळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago