ताज्याघडामोडी

अल्पवयीन शाळकरी मुलीवर गाडीत बलात्कार

महाराष्ट्रात पुन्हा धक्कादायक घटना 

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे दोन तरुणांनी 13 वर्षीय शाळकरी मुलीच अपहरण करत धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुख्य सुमेध मेश्राम आणि त्याच्या सहकारी मित्राला पुलगाव पोलिसांचा शोध सुरू आहे.

पुलगाव पोलिसात तक्रार जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असलेल्या 13 वर्षीय मुलीला तिला ओळखणाऱ्या तरुण सुमेध मेश्रामने चक्क चाकूच धाक दाखवत तिला कारमध्ये बसून अपहरण केले. त्यानंतर त्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला आहे. त्यानंतर तिला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत सोडून दिले आहे. अनेकानी अपहरण करतांना हा प्रसंग पाहिला असून पीडित मुलीने आपबीती आईला सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने पुलगाव पोलिसात तक्रार दिली. प्रकरणात पोलिसांनी गंभीरपणे घेत दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कशी घडली घटना पीडिता ही नियमितपणे घरातून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. पण तिच्यावर नराधम सुमेधची वाईट नजर होती. शाळेच्या गेटवर पोहचली, तेव्हा सुमेध मेश्रामने आणि त्याच्या सहकारी मित्राने पीडित मुलीला आवाज दिला. ती थांबताच तिला चाकूचा धाक दाखवत, तिचे तोंड दाबून तिला जोर जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यावेळी तिने आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी कारची काचे बंद असल्याने आवाज बाहेर न गेल्याने अत्याचार केल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे. यात मुख्य अत्याचार करता हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे बोलल जात असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago