ताज्याघडामोडी

आ.रोहित पवार यांना आव्हान, बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार

भाजप नेत्याच्या ट्विटने राजकीय गोटात खळबळ

 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आहेत. त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजप नेते मोहित कंभोज यांनी ट्विटमध्ये  म्हटले, की बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे. तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आमदार रोहित पवारांनी  मोहित कंबोज यांचे हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक हे या अगोदरच ईडीच्या कारवाईने तुरुंगात आहेत. त्यातच आता या दोन नित्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर सतत ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. काल केलेल्या ट्विटमध्ये माझे हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असे सूचक इशारा देणारे ट्विट मोहित कंबोज यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago