ताज्याघडामोडी

गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून आवळला सरकारी अधिकाऱ्याचा गळा

पाचही हल्लेखोरांना पोलीस कोठडी

गणपतीच्या वर्गणीवरून मंडळातील पाच जणांनी मिळून केंद्रीय गुप्तवार्ता अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील टेमघर भागातील केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. विश्वनाथ बाळाराम पाटील वय ३६ वर्षे, प्रतीक विलास बोरसे वय २६ वर्षे, राहुल राधाकिसन राहुलवार वय ३३ वर्षे, सागर पंढरीनाथ पाटील वय २५ वर्षे, जतिश रमेश फुलोरे वय २७ वर्षे अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर सुखसागर कुंदनसिंग रावत वय ३९ वर्षे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

जखमी रावत हे भिवंडीतील गोपालनगरमध्ये कुटूंबासह राहत असून त्यांचे टेमघर भागातील हरिहरेश्वर सोसायटीमध्ये केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे शासकीय कार्यलय आहे. त्यातच गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेवला आहे. त्यासाठी सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्गणीगोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. अश्याच भिवंडीतील टेमघर भागातील साईश्रद्धा मित्र मंडळ, टेमघर यांच्या मंडळातील कार्यकर्त्यांची वर्गणी गोळा करण्याची धावपळ सुरु असतानाच याच मंडळातील काही कार्यकर्ते १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या शासकीय कार्यालयात जाऊन बळजबरीने रावत यांना गणपती वर्गणीची मागणी केली. मात्र त्यांनी वर्गणी देण्यास नकार देताच पाच आरोपींनी त्यांना कार्यालयातच बेदम मारहाण करत त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते बेशुद्ध झाल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

रावत बेशुद्ध झाल्याचे पाहून त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारनंतर ते शुद्धी येताच शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांनी हल्लेखोर विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, ३५३, ४५२, १४३, १७४, १८४, १४९, ३८५, ३८७, प्रमाणे गुन्हा दाखल काही तासातच पाचही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) किरणकुमार कबाडी करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

6 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago