ताज्याघडामोडी

प्रेयसीला घेऊन हॉटेल मध्ये गेलेल्या तरुणाने केले विष प्राशन

शुल्लक कारणावरून घेतला टोकाचा निर्णय 

गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न  केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा शहरात आहे. प्रियकरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे असं नाव आहे. तो 23 वर्षांचा असून गोंदियातील आंबाटोली फुलचुर येथील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबला असताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाच्या रागातून शतकने विष प्राशन करून टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शतकने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या प्रियकरावर गोंदियातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago