ताज्याघडामोडी

काकानेच केली अंध भावाच्या ६ वर्षीय मुलीची हत्या

नांदेड शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती  13 ऑगस्ट रोजी घरासमोरून तिचे अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी गोदावरी नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.अंध भावाने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी चिमुकलीची हत्या केल्याची कबूली मृत मुलीच्या काकाने दिली.

   पोलिसांच्या चौकशीत त्या मुलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. परंतु त्यानंतर तो पसार झाला होता. मयत मुलीच्या वडिलांनी ही तिच्या कानात असलेल्या दागिन्यांसाठी काकाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि माने, सहाय्याक पोली निरीक्षक शिवसांभ घेवारे यांनी शनिवारी रात्री शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष सखाराम हटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकलीवर अत्याचार झाला का याचा खुलासा होऊ शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीला त्याच्या भावाने त्रास दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आंधळ्या जोडप्याला या डोळस मुलीचा आधार होता. म्हणूनच मी तिला मारलं अशी कबुली आरोपीने दिलीय. या मुलीच्या आठवणीत आपल्या भावाला रोज दुःख झालं पाहिजे असा आपला हेतू असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. इतकंच काय तर मला मारू नका मी सगळं खरं ते सांगतो अस सांगून आरोपीने चक्क पोलिसांना कोर्टात बघून घेण्याची भाषा वापरल्याची चर्चा आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago