ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “पायबायथ्री” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी ( ता पंढरपूर) येथील एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन “पायबायथ्री (πby३) कन्सल्टिंग सर्विसेस प्रा. लिमिटेड” या कंपनीत मध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    “पायबायथ्री” (πby३) हि कंपनी पुणे शहरात कार्यरत असून, या कंपनीचे मुंबईत सुद्धा ऑफिस आहे . हि कंपनी क्लाऊड ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अ‍ॅनालिटिक्स, अँप मॉडर्नायझेशन , क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा ऑन क्लाऊड, स्नोफ्लेक या उल्लेखनीय क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे . याशिवाय हि कंपनी स्नोफ्लेक फिन-ऑप्स आणि क्लाऊड-मायग्रेशन करीता प्रॉडक्ट्स देखील बनविते . पायबायथ्री (πby३) हि अक्सेंच्युर कंपनीसारख्या मल्टिनॅशनल कंपनीत २० हुन अधिक वर्ष काम केलेल्या दिग्गज थॉट लीडर्स नि स्थापित केली आहे .या कंपनीत बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील निलेश देशमुख हे त्यातील एक फाऊंडर आहेत. पायबायथ्री हि कंपनी लवकरच अमेरिका व ऑस्ट्रेलिया मध्ये कार्यरत होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

     या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील घनश्याम ज्ञानेश्वर खंडागळे ( भोसे-करकंब ता. पंढरपूर), काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रगती प्रमोद आटकळे (रा. पंढरपूर), दिपाली विष्णू वाघमोडे (आष्टी ता. मोहोळ), ऐश्वर्या कोटा (सोलापूर), सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील किरण संदिपान चव्हाण (वाफळे ता. मोहोळ), दिपाली अर्जुन गावंधरे (भोसे ता. पंढरपूर), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील रोहित बाळू क्षिरसागर ( पानीव ता. माळशिरस) आदी सात विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्याना कंपनीकडून वार्षिक ३.९ लाख चे पॅकेज मिळणार आहे.

   “पायबायथ्री” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे “पायबायथ्री” कंपनीचे अध्यक्ष दर्शन वाघचौरे, सीटीओ हिमांशू शहा, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago