ताज्याघडामोडी

आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय अधिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भद्रावती तालुक्यातील बरांज या गावातील ही खासगी आश्रमशाळा आहे. या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशानुसार हा तपास वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. संजय एकनाथ इटनकर असे या आरोपी अधिक्षकाचे नाव असून त्याच्यावर बाललैंगिक छळ कायदा (पॉक्सो), एट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीची नागपूर येथे वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

आठवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळीमा फासले आहे. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर ( वय- 53 ) याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

मुलीला चांगले शिक्षण मिळावे. या हेतूने पीडितेच्या आई- वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत ७ जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना ४ ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे, तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा, असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशीराच पोहोचले.

मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर १३ वर्षीय मुलीवर ५३ वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले. पीडितेला तिच्या वडिलांनी हिंगणघाट येथील घरी आणल्यावर घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. अशातच मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार झाल्याचे घरमालकीनच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. तक्रारीनंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago