ताज्याघडामोडी

तरुणीस कॉलगर्ल म्हणून फोटो वायरल करण्याची दिली धमकी

 

दोघांविरोधात गुन्हा दाखल 

मोबाईलवर आलेल्या इन्स्टंट (कर्ज) लोनच्या जाहिरातीच्या माध्यमातून कर्ज घेणे नागपुरच्या एका २१ वर्षीय तरुणीला भलतेच महागात पडले आहे. लोन देण्याच्या बहाण्याने त्या तरुणीच्या मोबाईलमधील सर्व फोटो काढून घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी तिचे फोटो वायरल करण्याची धमकी देऊन हजारो रुपये उकळण्यात आले. रोज-रोजच्या धमक्यांना त्रासून त्या तरुणींनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणाचे धागेदोरे चीन पर्यत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी कैफ इब्राहिम सय्यद (कऱ्हाड) आणि इरशाद इस्माईल शेख (पुणे) विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार तरुणीने जानेवारी महिन्यात आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दिली होती. मोबाईल वरील एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला होता. त्यासाठी तिला पॅनकार्ड क्रमांक, फोटो आयडी मागण्यात आला होता. काही वेळातच तिच्या खात्यात १ हजार २०० रुपये जमा करण्यात आले. परंतु त्यानंतर त्या तरुणी ला पैसे द्या नाही तर तुमचे फोटो वायरल करू अशा धमक्या मिळू लागल्या. त्या भीतीने त्या तरुणीने पहिल्यांदा ५ हजार ४०० आणि नंतर ७ हजार ८०० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर सुद्धा धमक्या येत असल्याने अखेर त्या तरूणीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केवळ १हजार २०० रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर त्या तरुणीला अनेक वेळा पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर तुमचे फोटो कॉलगर्ल म्हणून वायरल करू अशी धमकी देण्यात आली होती.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago