ताज्याघडामोडी

स्वेरी मध्ये उच्च शिक्षण संस्था चालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मंगळवार दि. २६ जुलै रोजी शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न झाली.

            बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील या होत्या तर या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया शासनाकडून लवकरात लवकर भरण्यासाठी दिनांक ७ ऑगस्ट२०२२ रोजी बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे होणाऱ्या संस्थाचालकांच्या बैठकीत सदरचा विषय उपस्थित करून माननीय उच्च न्यायालयात भरती संदर्भात दाद मागण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच वेगवेगळ्या विद्यापीठ स्तरावर संस्थाचालकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्र संघटना स्थापन करावी’ असेही सर्वानुमते ठरले. सदरची जबाबदारी संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी घ्यावी.’ असे सर्वानुमते ठरले. या वेळी उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवाजी विद्यापीठकोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटेभाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ व रसायनशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा.बी.एन.जगताप व शिक्षणतज्ञ प्रा.आनंद मापुसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने वेणुनगर (गुरसाळेता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्धल व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यामुळे स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांचा सत्कार संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर बैठकीचे आयोजन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी उत्तमरीत्या केल्याबद्दल त्यांचा संघटनेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्या बैठकीस कार्याध्यक्ष बाबूराव गायकवाडसचिव दशरथ गोपमाढा तालुक्याचे माजी आमदार विनायकराव पाटीलचंद्रकांत देशमुख व अनेक संस्थांचे अध्यक्षमहाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. संपूर्ण बैठकीचे नियोजन डॉ.जयप्रकाश बिले यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago