ताज्याघडामोडी

पंढरपुराच्या अनेक गल्लीबोळातील रस्ते होणार चकाचक

शहरात नागरी सुविधांसाठी २ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे   

पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला २ कोटी ३३ लाख रुपये तर मंगळवेढा नगरपरिषदेला २ कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम पद्धतीने पुरवता याव्यात यासाठी हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली.
यावेळी बोलताना आ समाधान आवताडे यांनी सांगितले की राज्यामध्ये सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मागणी मान्य करत भरीव आणि महत्वपूर्ण निधीची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद यांना निधी मंजूर झाला असून भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले पंढरपूर शहर व संतभूमी मंगळवेढा ही दोन्ही शहरे सर्व सुविधायुक्त अध्यात्मिक व सांप्रदायिक भूमी म्हणून नावारूपास आणण्यासाठी विविध मार्गांनी शासनदरबारी पाठपुरावा करून विकासासाठी सर्वतोपरी कटिबद्ध राहणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील मंजूर कामे-

टाकळी बायपास, प्रथमेश मंगल कार्यालय पाठीमागे, विठ्ठल नगरी सोसायटी, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, स्टेट बँक पंढरपूर ते टिळक स्मारक मंदिर, पंढरपूर अंतर्गत गटार बांधणे १० लाख, डगरी गल्ली ते उमदे गल्ली, पंढरपूर येथे लादीकरण करणे १०लाख, जुनी इसबावी, गावठाण शिंदे वस्ती जवळ इसबावी ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे १५ लाख, प्रतिभाताई परिचारक नगर ड्रेनेज लाईन टाकणे १५.०० लाख, यमाईदेवी मंदिर सुशोभिकरण व दुरुस्ती करणे १० लाख, प्रभाग क्र.१५ मध्ये गुरुकृपा हौसिंग सोसायटी दत्त मंदिर येथे लादीकरण करणे १०लाख, प्रभाग क्र १५ मध्ये गणेशनगर, पंढरपूर येथे सभामंडप बांधणे १० लाख, गणेश मंदिर, मंगळवेढेकर, सभामंडप बांधणे १०लाख, सांगोला चौक पंढरपूर येथे १२ मीटर उंचीचा हायमास्ट दिवा बसविणे ३लाख, इसबावी श्रीराम मंगल कार्यालय ते राजू मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, इसबावी जुने गावठाण शिंदे वस्ती जवळ छोट्या गल्ली पर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, इसबावी विसावा मंदिर ते हरीनायान पार्क रोड रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, कुंभार गल्ली ते जुना नाका रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, भुयार मारुती ते आनंद महाराज रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, आप्पा अभांगराव घर ते राजेंद्र चौडवार घर रस्ता कॉंक्रिटीकरण १० लाख, करणे कर्मयोगी शाळा ते सतिश श्रीखंडे रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, विनायक दिवाकर घर ते गजानन धोत्रे घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, गुरुदेव नगर कोर्टीकर घर ते राऊत घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, विक्रम धाबा ते बहारो ते माळी घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व आराम गाडी कारखाना पिण्याच्या पाण्यासाठी बोर पाडणे इलेक्ट्रिक मोटर बसविणे हौद बांधणे १५ लाख, मीराबाई महाराज मठ ते भोसले चौक रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, प्रोग्रेस शाळा जवळ प्रशांत परिचारक नगर पंढरपूर येथे लादी करण करणे १० लाख रुपये.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago