ताज्याघडामोडी

अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन

इंदूर: अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.18 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार्‍या अहिंसा यात्रेच्या सोशल मीडिया प्रचारासाठी 8 सदस्यांची समिती गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मोहिमेसंदर्भात गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध क्षेत्रातील आणि विविध व्यवसायातील लोक आहेत.गायीला राष्ट्रीय प्राणी बनवणे हे या यात्रेचे उद्दीष्ट आहे असे यात्रेचे समन्वयक गौ रक्षक व पत्रकार विनायक अशोक लुनिया यांनी सांगितले.

पत्रकार विनायक अशोक लुनिया यांनी सांगितले की पत्रकार व समाजसेवक डॉ.राजेश फडे पंढरपूर जि सोलापूर, दूरदर्शन अँकर व जीवन प्रशिक्षक श्रीमती नीना जैन इंदूर, पत्रकार शिव चौरसिया जबलपूर, जीवन जैन चहा विक्रेते नागदा‌ उज्जैन, पत्रकार शैलेश दीक्षित कानपूर, पत्रकार अतुल जैन बामौर कलान,शिवपुरी, कु. सोनल जैन शारीरिकदृष्ट्या अपंग, कोटा राजस्थान,पत्रकार भूपेंद्र परमार पिंडवाडा, सिरोही हे आठ जण आपली सोशल मीडिया प्रचारकाची भूमिका योग्य रीतीने पार पाडून आपल्या निवडीला योग्य‌ न्याय देतील .

सर्व सदस्यांची सोशल मीडिया प्रचारक म्हणून नियुक्ती करताना श्री.लुनिया यांनी यात्रेच्या प्रचारात सर्व सदस्यांना सक्षम सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. मोहिमेत जास्तीत जास्त प्रमाणात संपर्क करुन या मोहिमेला बळ देण्याचे आवाहन श्री लुनिया यांनी देशभरातील जनतेला आणि गो भक्तांना केले आहे.

 सोनल शरीराने अक्षम पण मनाने सक्षम 

श्री. लुनिया यांनी सांगितले की, कोटा राजस्थान येथील 41 वर्षीय सोनल जैन या दोन्ही पायांनी अपंग आहेत परंतु गो मातेच्या संवर्धन मोहिमेत तिची भूमिका निभावण्यासाठी कु. सोनल यांनी फोन केला आणि सांगितले की मी तुमच्या मोहिमेत शारीरिकदृष्ट्या सामील होऊ शकत नाही. मला गौ मातेच्या या मोहिमेचा एक भाग व्हायचे आहे, मला या मोहिमेत सामील करून घ्यावे.

 आर्थिकदृष्ट्या अक्षम पण मनाने श्रीमंत

नागदा येथील जीवनलाल जैन जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असले तरी मनाने इतके श्रीमंत आहेत की, दररोज 500-700 रुपयांचा चहा विकून कमावलेल्या उत्पन्नातील 30 टक्के वाटा गरीबांना मोफत चहा देण्यासाठी करतात. आज या मोहिमेत सहभागी होताना आपल्या आर्थिक व्यवस्थेची चिंता न करता श्री.जैन यांनीही काही दिवस गौ मातेच्या सेवेत सहभागी होण्याची भावना व्यक्त केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago