ताज्याघडामोडी

वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; धक्कादायक घटना

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वेटरने बिल मागितलं, म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

योगेश सर्जेरावर पारधे (वय २८ अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२), नितीन अशोक वाडेकर (वय ३२ रासदर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शारदा निलेश भिलारे (वय ३८ भिलारेवाडी कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहरण करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर याआधी ३०२, ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यांना जेजुरी जवळील दोरगेवाडी डोंगरातून पाठलाग करून पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमाळ हॉटेल आहे. आरोपी पारधे, कानडे, वाडेकर, बेंद्रे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. आरोपींनी जेवण केल्यानंतर हॉटेलमधील कामगार किशोर कोईराला याने त्यांच्याकडे बिल मागितले. त्यानंतर आरोपींनी कोईराला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भिलारे यांना धमकावले. उद्या तुम्ही या मरणाची खबर ऐकाल, अशी धमकी आरोपींनी दिली. कोईरालाला धमकावून आरोपींनी मोटारीत बसवले. त्यानंतर आरोपी त्याला घेऊन पसार झाले. काही अंतरावर त्याला सोडून त्याला आरोपी पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भिलारे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस कर्मचारी विक्रम सावंत व निलेश खैरमोडे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, अपहरण करणारे आरोपी जेजुरी जवळील दोरगेवाडी येथील डोंगरात आरोपी लपून बसले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धिरज गुप्ता कर्मचारी रविंद्र चिप्पा, गणेश गुप्ता, तुळशीराम टेंभुर्णे, सचिन गाडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago