ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेची याहीवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम

शैक्षणिक वर्ष २०२१-२२  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक १७.०६.२०२२ रोजी जाहीर झाला.

पंढरपूर तालुक्यातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा सालाबादप्रमाणे याहीवर्षी १०० % निकालाची परंपरा कायम राखत इ.१० वी चा निकाल १०० %  लावून प्रशालेने उत्तुंग यश मिळविले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आणि शिक्षक हेच पालक हि प्रणाली वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सहज आणि सोपे गेले.

तसेच इ.१० वीच्या विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यास करुन घेतल्यामुळे व कोरोना कालावधीतही विद्यार्थ्यांकडून सकाळी ९.०० ते दु.२.०० वाजेपर्यंत ऑनलाईन क्लासद्वारे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला गेला. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असते.

 सदरच्या इ. १०वी परीक्षेमध्ये अंजली दिंडोरे हिने  ९१.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच समर्थ वेल्हाळ याने ८७.२०% मिळवत व्दितीय क्रमांक तर रिया स्वामी  हिने ८६.६० % गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला या प्रशालेतील इ. १०वी परीक्षेस एकूण २१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.सदर विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री साबळे, श्री जाधव, श्री याळगी, सौ.कोरबू, श्री त्रिंबक कुलकर्णी, श्री अरविंद  कुलकर्णी, चौगुले सर, श्री डूणे या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago