ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये ” जागतिक वसुंधरा दिवस” साजरा

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पर्यावरण तसेच जागतिक जंगल तोड या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून सर्वञ साजरा केला जातो. याच अनुषंगानेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिवस अर्थात “वर्ल्ड अर्थ डे” या कार्यक्रमा प्रसंगी अर्थ आणि विज्ञान मंत्रालय व भारत सरकारचे माजी सेक्रेटरी डाॅ. एम. राजीवन यांनी वातावरण बदलाचे विज्ञान म्हणजेच सायन्स ऑफ क्लायमेट चेंज याविषयी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग पर्यावरण मातृभूमी वसुंधरा यांचा कसा बचाव करायचा शिवाय सेव्ह नेचर सेव्ह अर्थ या म्हणीप्रमाणे अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वय म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी विद्यार्थ्यांना वर्ल्ड अर्थ डे संदर्भामध्ये जागृती करून डॉ. एम. राजवन यांनी दिलेल्या अनमोल संदेशाचे पालन करून निसर्ग तसेच वसुंधरा वाचविण्याचे आव्हान केले.

 या कार्यक्रमात काॅलेज मधील ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago