ताज्याघडामोडी

स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

डिप्लोमाचा प्रवेश आता झाला सोपाफक्त दहावीच्या आसन क्रमांकावर करता येणार रजिस्ट्रेशन

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०२ जून २०२२) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेकागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवारदि. ३० जुन२०२२ पर्यंत चालणार आहे. दहावीच्या निकालापूर्वीच डिप्लोमा प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त आपल्या दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. दहावी परीक्षेच्या आसन क्रमांकासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या हायस्कूलशी संपर्क साधावा.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

      सन २०२२-२३ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेभरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रेकागदपत्रांची तपासणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालकतंत्र शिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शनपालकांचा होणारा संभ्रमसंबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १५ वे वर्ष असून या  महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. रजिस्ट्रेशनची ही प्रकिया दि.०२ जून २०२२ पासून ते दि. ३० जुन २०२२ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.०३ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मोबा.क्र. ९८९०५६६२८१) व प्रा. एम्. एम. मोरे (९४२१९६०२५८) यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकालआदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकनमहाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्डगेली सलग पाच वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

6 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago