ताज्याघडामोडी

निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव दीड लाखाची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

बेकायदा वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी व ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी दीड लाखांची लाच स्विकारताना निलंगा तहसीलचे विद्यमान तहसीलदार गणेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लातूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली आहे.

लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे मागील 25 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 26, 28, 30, 31 मे अशा चार दिवस लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली होती. एकुण एक लाख 80 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती एक लाख पन्नास हजार देण्याचे ठरले होते. यातील आरोपी लोकसेवक तहसिलदार गणेश जाधव व एजंट रमेश मोगेरगे यांनी तक्रारदार यांना वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक 30 हजार प्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार रुपये प्रति महा असे मागील तीन महिन्याचे एक लाख 80 हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती एक लाख पन्नास हजार रुपये ठरवून खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांच्याकडे देण्यासाठी सांगितली.

त्या प्रमाणे दि.4 जून रोजी खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांचे घरासमोरच लाच मागणी केलेली रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसिलदार गणेश जाधव व खाजगी एजंट या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

21 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago