ताज्याघडामोडी

वाचन,संशोधन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे : यतीन शहा

कर्मयोगीचा कॅम्पस म्हणजे नंदनवन.“कर्माटेक 2K22” चे शानदार उद्घाटन

वाचन, संशोधन आणि आत्मविश्वास या त्रीसुत्रींचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी मनामद्धे न्युनगंड न बाळगता कठोर परिश्रमाच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत असे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी बदलत्या तंत्रज्ञाना बरोबर स्वत:चे ज्ञान विकसित करावे असे प्रतिपादन प्रिसीजन कॅमशाफ्ट ली. कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योजक श्री. यतीन शहा यांनी केले. कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालायचा कॅम्पस पाहून मी भारावून गेलो अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली. 14 मे रोजी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये आयोजित केलेल्या “कर्माटेक 2K22” या राज्यस्तरीय तंत्र परिषेदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तसेच श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांचे व्यवस्थापन कौशल्य व कामकाज यांचे श्री यतीन शहा यांनी विशेष कौतुक केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कर्माटेक 2K22 तंत्र परिषदेला ला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी करून स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कर्माटेक 2K22 तंत्रपरिषदेचे संयोजक व महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी पाहुण्यांची ओळख करून देऊन “कर्माटेक 2K22” कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. सदरच्या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे माननीय आतिथी म्हणून उपस्थित होते.
14 मे 2022 रोजी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, मोडेल मेकिंग, माइंड स्पार्क, प्रोजेक्ट एक्सिबीशन , सर्किट सुडोकू अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील पाचशे हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे वीस हजारहून अधिक रुपयाची बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली. कोरोंनातून आता आपण सावरलेलो आहोत त्यामुळे येत्या काळात अधिक परिश्रम करून विद्यार्थ्यानी आपले शैक्षणिक नुकसान भरून काढावे असे आवाहन डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी आपल्या भाषणामद्धे कोरोंना काळामद्धे केलेल्या ज्ञानदानाबद्दल सर्व प्राध्यापक वर्गाचे विशेष कौतुक केले. कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोंना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले असून या कोरोंना काळातील कर्मयोगीचे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या ज्ञांनामद्धे कधीही कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामद्धे ही कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप पप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. समन्वयक प्रा.योगेश घोडके, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मृणालिनी कोकणे, मयूरी मोहिते, साक्षी जत्राते व अंजली कुणाले या विद्यार्थिनिं केले. प्रा. राहुल पांचाळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago