ताज्याघडामोडी

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात केले बदल; आता RTOच्या माराव्या लागणार नाहीत फेऱ्या

जर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत.

नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना नक्की मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (DL) मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून नवीन नियम लागू केले जातील. नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे. या नियमानुसार RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही.

याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओमध्ये परीक्षेसाठी थांबण्याची सुद्दा गरज राहणार नाही. नवी नियमानुसार आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये DL साठी नोंदणी करू शकता. येथून ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना या ट्रेनिंग सेंटरमधून प्रमाणपत्र देण्यात येईल . या प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा DL तयार केला जाईल. त्यामुळे RTOमध्ये जाऊन परिक्षा देण्याचे कष्ठ सुद्धा वाचले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे थिअरी आणि प्रात्याक्षिक अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल (LMV) या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे आहे, जो 29 तास चालेल. प्रात्याक्षिकांसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रात्याक्षिकांसाठी 21 तास द्यावे लागतील. उर्वरित 8 तास तुम्हाला थेअरी शिकवली जाईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

21 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago