ताज्याघडामोडी

वर्गशिक्षिका विद्यार्थ्यावर रागवली आणि येऊ लागले अश्लिल फोन कॉल्स

वर्गात शिक्षिका रागावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने असा सूड उगवला की ऐकून पोलीसही चक्रावले. बारावी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्ग शिक्षिकेचं चक्क बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. यानंतर या अकाऊंटवरुन या विद्यार्थ्याने अश्लिल फोटो, व्हिडिओ शेअर केले. धक्कादायक म्हणजे त्याने वर्ग शिक्षिकेचा मोबाईल नंबरही इन्स्टाग्रामवर शेअर केला. 

काही दिवसांनी या महिला शिक्षिकेला अचानक अनोळखी क्रमांकावरुन अनेक फोन येऊ लागले. फोन करणारे अश्लिल संभाषण करु लागले. अचानक होत असलेल्या या प्रकाराने शिक्षिकेला मोठा धक्का बसला. याबाबत शिक्षिकेने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत तात्काळ पावलं उचलत शोध सुरु केला.

सायबर सेलने तपास करत या विद्यार्थ्याचा शोध लावला. आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याने हे कृत्य केल्याच पाहून शिक्षिकाही हैराण झाली. सतत काही ना काही कारणाने शिक्षिका अपमान करत असल्याची भावना या मुलाच्या मनात होती. याचा सूड घेण्यासाठीच शिक्षिकेचं बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केल्याची माहिती या विद्यार्थ्याने पोलिसांना दिली. या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

13 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago