ताज्याघडामोडी

संपत्तीच्या वादातून काकांनी पुतण्याला भररस्त्यात संपवलं; चाकूनं भोसकून हत्या

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं भररस्त्यात एका युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं उघड झाले आहे.

काकाने मालमत्तेच्या वादातून पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. पुतण्याच्या मृत्यूपर्यंत निर्दयीपणे चाकूने भोसकण्यात आले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडत होता. मात्र युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. गुन्हेगारांना रोखण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शहराच्या लिसाडी गेट परिसरात राहणारा साजिद रविवारी एका कामानिमित्त बह्मपुरी येथील इत्तेफाक नगर येथे गेला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ३ लोकांनी साजिदला पकडले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. चाकू लागल्याने साजिद गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. त्यानंतरही जखमी साजिद उठवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याला जिवंत पाहून पुन्हा चाकूने भोसकलं आणि त्याचा गळा कापला. भररस्त्यात घडलेल्या घटनेने लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी साजिदला हॉस्पिटलला नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. युवकावर भररस्त्यात चाकूने वार होत होते परंतु त्याठिकाणी उपस्थित एकानेही गुन्हेगारांना रोखण्याची हिंमत केली नाही. इतकेच नाही तर घटनेनंतर आरोपींना पकडण्यातही आले नाही. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साजिदचं काकासोबत संपत्तीवरून वाद सुरू होता. चाकूने हल्ला करणारे साजिदचे ३ काका शाहजाद, नौशाद आणि जावेद होते. हत्या करणारे फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले आहे.

मेरठचे एसपी सिटी विनीत भटनागर म्हणाले की, स्थानिक लोकांनी जर विरोध केला असता तर हा गुन्हा घडला नसता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. मृत युवक आणि आरोपींमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. सुरुवातीच्या तपासात एका प्लॅटचा हा विवाद होता. आरोपींची ओळख पटवली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लवकरच या आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago