ताज्याघडामोडी

ही आत्महत्या नाही तर हत्या, ‘त्या’ तिघांना सोडू नका

आग्रा येथे एका बीटेकच्या चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाचे वडील भाजपाचे नेते आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला.

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. नगला पदीच्या दुर्गानगर भागात राहणाऱ्या अनूप तिवारी हे भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष आहेत. त्यांना २ मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव मृत्यूंजय तिवारी तर लहान मुलाचे नाव धनंजय तिवारी आहे.

धनंजय तिवारी हा आग्रा येथील एका खासगी कॉलेजमध्ये बी टेकचं शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी धनंजय त्याच्या रूममधून बाहेर आला नाही. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला.

खोलीतील दृश्य पाहून कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला. धनंजयचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. धनंजयचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला तेव्हा आसपास राहणारी लोकंही धावत आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी धनंजय तिवारीचा गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला. धनंजयच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

23 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago