ताज्याघडामोडी

18 वर्षांच्या मुलांना मिळणार 22 वर्षांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स

टू व्हीलर किंवा कार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या 18 वर्षांच्या कॉलेज तरुणांसाठी चांगली बातमी आहे. मोटार वाहन दुरुस्ती कायद्यानुसार आता परवाना 22 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल, असे ताडदेव RTO ने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे:

ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत काळसकर याविषयी म्हणाले कि ‘अनेक नागरिकांना वयोगटानुसार परवान्यांच्या वैधतेबद्दल माहिती नसते.

प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट सांगण्यात आले आहे की 30 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी, ड्रायव्हिंग लायसन्स 40 वर्षांपर्यंत वैध असेल. 31 ते 50 वयोगटातील, नवीन परवाना नूतनीकरणाची वैधता दहा वर्षांसाठी असेल तर 51-55 वयोगटासाठी, नवीन परवाना 60 वर्षांपर्यंत वैध असेल. ५५ वर्षांच्या वरील परवाना नूतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी, वैधता पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल, असेही त्यांनी सांगितले.

आरटीओच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांच्या परवान्यांची मुदत संपली आहे त्यांनी एक वर्षाच्या आत आपल्या परवान्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा, संबंधित व्यक्तीला परवाना मिळण्यासाठी पुन्हा एकदा ऑनलाइन चाचणीने सुरुवात करावी लागेल. मागील एक वर्षात काही जणांना हि चाचणी पुन्हा द्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

शिकाऊ परवाना घरबसल्या मिळणार

शिकाऊ परवाना आता घरबसल्याच ऑनलाइन मिळवता येणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरटीओ कार्यालयांमध्ये नेहमीच ड्रायव्हिंग चाचण्यांसाठी अर्जदारांची मोठी गर्दी असते, म्हणूनच आम्ही ताडदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरिवली येथे या चारही ठिकाणी स्लॉट वाढवले ​​आहेत. ताडदेव आरटीओमधील स्लॉट अलीकडेच एका दिवसात सुमारे 600 वरून 900 उमेदवारांपर्यंत वाढवण्यात आले असल्याचे काळसकर यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago