ताज्याघडामोडी

आईने केली दीड वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्या दीड वर्षीय मुलाची गळा दाबन हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपी मातेने आपला गुन्हा कबूल केला असून तिला अटक करण्यात आले आहे.

अॅडिशनल एसपी अभिषेक राजननी सांगितले की, संजीत पंडित बिजुरी छत्तीसगड मध्ये ठेकेदारीचे काम करतात. त्यांची पत्नी पुष्पा आणि दोन मुलं अनुपपूरमध्ये राहतात. दोघांमध्ये त्यांचा लहान मुलगा अविनाशवरुन कायम वाद होत होते. पति संजीतला पुष्पाच्या चारित्र्यावर संशय होता.

त्यामुळे त्याने लहान मुलगा अविनाशला आपलं मुल कधीच मानले नाही. त्याच्यावरुन त्यांच्यात कायम भांडणं होत होती. अखेर संजीतने पुष्पाला तिच्या माहेरी सोडले होते. तसेच घरी यायचे असल्यास लहान मुलाची डिएनए टेस्ट केल्यावरच यायचे असे बजावले होते. सततच्या भांडणांना कंटाळून अखेर पुष्पाने रागाच्या भरात रात्री 11 वाजता अविनाशचा गळा दाबून हत्या केली.

रात्री मुलाला बेशुद्धावस्थेत पाहिल्यावर संजीतने रुग्णालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आई-वडिलांवर संशय व्यक्त करत त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता आईने मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago