पंढरपूरच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा

राज्य शासनाने तालुका पातळीवर क्रीडापटूंना व क्रीडाप्रेमींना सरावासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचे प्रस्तावही तेथील स्थानिक नेत्तृत्वाकडून पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर झाले.पंढरपुर शहर व तालुक्याचा विचार करता या तालुक्यात विविध क्रीडा प्रकारात नेपुण्य प्राप्त असलेल्या क्रीडापटूंची संख्या मोठी आहे.तरी पंढरपूर तालुका क्रीडा समितीची तातडीने बैठक घ्यावी व क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा अशा आशांची मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने तालुका क्रीडा समितीचे प्रभारी अध्यक्ष तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अशी माहिती या प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दिनेश गोडसे यांनी दिली.             

 या बाबत अधिक माहिती देताना दिनेश गोडसे म्हणाले कि,महाविकास आघाडी सरकारने तालुका क्रीडा संकुलास पूर्वी देण्यात येणाऱ्या २ कोटी निधीमध्ये भरीव वाढ करून ५ कोटी निधीची तरतूद केली आहे.पंढरपूर शहरात क्रीडा संकुल व्हावे हि गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे.पंढरपूर तालुका क्रीडा समितीची गेल्या अनेक महिन्यात बैठकच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही या बाबत तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.आणि आम्ही शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत खाबिया यांच्या मार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.   

 हे निवेदन देताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिनेश गोडसे व सहकारी अण्णा हजारे, संतोष शेळके, कृष्णा घोलप, विठ्ठल शिंदे,वैभव पाटील आदी उपस्थित होते.                        

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

15 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago