ताज्याघडामोडी

आता पोलीसच चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी, गृहमंत्रालयाचा निर्णय

कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना बजावली होती. मात्र, यानिमित्ताने फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपनं ठरवले होते.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार चिन्हे आहेत. मात्र, पोलीस फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा निर्णय घेतला आहे.

फडणवीस हे बीकेसीच्या पोलीस ठाण्यात जाणार होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केले होते. मात्र, राज्याच्या गृहमंत्रालयाने देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन पोलीस जबाब नोंदवणार आहेत. देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. गृहखात्याच्या बैठकीत फडणवीस यांच्या घरी जाऊन पोलीस जबाब नोंदवतील निर्णय झाला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीची नोटीस बजावली आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस बदल्यांमधील घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली, असे सांगण्यात आले होते. मुळात बदल्यांमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी घोटाळा बाहेर काढणाऱ्यांना चौकशीला बोलावलं जातंय, अशा शब्दांत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी मार्च 2021 मध्ये फडणवीसांनी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

मुंबई पोलिसांनीही ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत चौकशीसाठी फडणवीसांना प्रश्नावली आणि नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आपण पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी चौकशीला हजर राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले होते. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच विधानसभेत व्हिडिओ बॉम्ब फोडला होता. भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यावर महाविकास आघाडी सरकारने अद्याप ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही.

फडणवीस यांच्या विनंतीनंतर सोमवारी महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, हा व्हिडिओ बनावट असल्याची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे नक्की सरकाकडून पेन ड्राईव्ह व्हिडिओबाबत काय माहिती देण्यात येणार याचीही उत्सुकता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago