गुन्हे विश्व

चारित्र्याचा संशय घेत मोबाइल हिसकावून घेत मारहाण

कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एका तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून पोलिसांनी मृत तरुणीच्या एका मित्राविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी अद्याप संशयित आरोपीला अटक केली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संकेत पंडित शिखरे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील रहिवासी असणारी मृत तरुणी हातकणंगले तालुक्याच्या एका गावातील खाजगी रुग्णालयात नोकरीला होती. ती वारंवार फोनवर बोलत असल्यानं तिचा संशयित आरोपी संकेतसोबत वाद झाला होता. याच वादातून आरोपी संकेत यानं मृत तरुणीवर चारित्र्याचा संशय घेतला होता.

संबंधित घटना 20 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. पण आत्महत्येचं नेमकं कारण समोर येत नव्हतं.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संकेत शिखरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहुपुरी पोलीस करत आहेत.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago