फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये “जागतिक महिला दिन” सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न झाला.

     संसारात जीवन  जगत असताना  दररोजच्या  घाईगडबडीतुन  एक दिवस तरी स्वतःसाठी मोकळेपणाने जगूया हाच उद्देश घेऊन आजचा “जागतिक महिला दिन”  साजरा करण्यामागचा उद्देश होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. संगीता पाटील होमिओपॅथी कन्सल्टंट , मानसोपचार तज्ञ तसेच सौ. सुरेखा रुपनर, सौ. सारिका रुपनर, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील  उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला पालक यांना  जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

   आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे डॉ. संगीता पाटील यांनी  उपस्थित महिलांसमोर  बोलताना सांगितले.त्याचबरोबर  खाण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि तोटे होतात हेही त्यांनी सुंदररित्या समजावून सांगितले.

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची, नृत्य, गायन, कोडी, उखाणा इत्यादी प्रकार ठेवण्यात आले होते.या खेळामध्ये  महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन या खेळाचा  मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या महिलांचे भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमाला महिला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मृणाल राऊत, सौ. शितल बिडवे  आणि सौ. शितल लिगाडे  यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.किरण कोडक  यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील  व पर्यवेक्षक सौ. वनिता बाबर  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

21 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago