ताज्याघडामोडी

सरकारने वाहनांसाठी जारी केला नवा नियम, या दोन गोष्टींशिवाय चालवता येणार नाही गाडी

तुम्ही कोणतंही वाहन चालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वाहनांशी संबंधित एक नवं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. गाड्यांच्या पुढील आरशांवर आता लवकरच फिटनेस सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन मार्क लावणं अनिवार्य होणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यात नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेट आणि मोटर वाहन रजिस्ट्रेशन मार्क वॅलिडिटी नियमांत दिल्याप्रमाणे दाखवणं बंधनकारक असणार आहे.

काय आहे नवा नियम?

नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हेवी गुड्स, पॅसेंजर व्हीकल, मीडियम गुड्स आणि लाइट मोटर व्हीकल्ससाठी हे विंड स्क्रीनच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात द्यावं लागेल. तर ऑटो-रिक्षा, ई-रिक्षा, ई-कार्ट आणि क्वाड्रिसायकलसाठी हे विंड स्क्रीनच्या डाव्या बाजूला लावलं जाईल.

टू-व्हीलरसाठी असा असेल नियम – टू-व्हीलरसाठी वाहनाच्या निर्धारित भागावर फिटनेस सर्टिफिकेट आणि मोटर वाहन रजिस्ट्रेशन मार्क लावला जाईल. यासाठीचा फॉन्ट टाइप एरियल बोल्ड फॉन्ट असेल. निळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर पिवळ्या रंगात हे बसवलं जाईल. दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स फिजीकली जवळ न ठेवता तुम्ही अधिकृत App द्वारे ते ऑनलाइन रुपात जवळ ठेवू शकता.

यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स विरसल्याची, फाटल्याची कोणतीही चिंता राहणार नाही. तसंच ट्रॅफिक पोलिसांना सरकारी अधिकृत App मधील हे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं कायदेशीर आहे. ट्रॅफिक पोलिसांना चालक डिजीलॉकर किंवा एम-परिवहन मोबाइल App वर डिजीटल स्वरुपात वाहतुकीची कागदपत्रं दाखवू शकतात. DigiLocker मध्ये डॉक्युमेंट सेव्ह ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत डॉक्युमेंटची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago