ताज्याघडामोडी

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

मित्राच्या निधनाचा धक्का बसल्याने तरुणाने आयुष्य संपवलं. औरंगाबाद जिल्ह्यात ही हृदयाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. चेतन दिलीप बनस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 28 वर्षांचा होता.

जेमतेम आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राने जगाचा निरोप घेतला होता. आजारपणामुळे मित्राचा मृत्यू झाला होता. मात्र जीवलगाचा विरह सहन न झाल्यामुळे चेतनने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन चेतनने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं चेतन वारंवार बोलायचा. अखेर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसल आहे.

काय आहे प्रकरण?

मित्राच्या निधनाने व्याकूळ झालेल्या 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवली. औरंगाबादमधील सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत ही घटना घडली आहे. मयत चेतन दिलीप बन्सवालने संगणकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले होते.

आठ दिवसांपूर्वी मित्राचे निधन

अवघ्या आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राचा आजारपणाने मृत्यू झाला होता. मित्राचा विरह चेतनला सहन होत नव्हता. मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं तो वारंवार बोलत असे.

पंख्याला गळफास

अखेर, घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन चेतनने आपल्याही आयुष्याचा शेवट केला. एकामागून एक दोन्ही मित्रांनी अखेरचा श्वास घेतल्याने मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतनच्या मित्राच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते.

आता चेतननेही टोकाचे पाऊल उचलल्यामुळे बन्सवाल कुटुंबावरही आभाळ कोसळलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago