फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सांगोला: येथिल  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शै. वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डी फार्मसी  विद्यार्थ्यांचे स्वागत  मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या उपस्थितीत पार पडला. 

      हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षींतील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी फार्मसीचे  दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सर्फराज काझी सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित  होते.

           उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख करून  देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा, लायब्ररी,  ऑफिस,  इत्यादी विभागांची माहिती करून दिली.  पूर्ण वर्षाचे शेड्युल यावेळी विद्यार्थांना सांगितले. या वेळी फणी गेम्स, गीत  व नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली.मिस फ्रेशर म्हणून कु.साक्षी बालडे व मिस्टर फ्रेशर म्हणून चित्रक वाघमारे यांची निवड करण्यात आली.  मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व समारोप  प्रा. सुरज मणेरी  यांनी केले.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

12 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago