गुन्हे विश्व

कल्याण काळेंनी आमच्या शेतातील ऊस पेटवला

वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम धोंडीबा नाईकनवरे यांच्या शेतातील ऊस कल्याण उत्तम काळे रा-वाडी कुरोली ता पंढरपुर यानेच मुद्दाम खोडसाळपणाने आमचे अर्थीक नुकसान व्हावे ह्या उद्देशाने सदरचा ऊस पेटवुन दिलेला आहे अशा आशयाची फिर्याद वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम नाईकनवरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादी नुसार फिर्यादी तुकाराम धोंडिबा नाईकनवरे हे आई सुशिला,पत्नी जयश्री, व एक मुलगा व भाऊ सुभाष ,व भावजय असे वाडीकुरोली येथील शेतात घर करून एकत्रात राहणेस असुन शेती व्यवसाय करून कुंटुबांची उपजिविका भागवतात. दिनांक 20/02/2022रोजी रात्रौ 10/30वा.चे सुमारास फिर्यादी व त्याचे कुटूंबीय हे घरामध्ये टीव्ही पहात असताना शेजारचे ज्ञानेश्वर मच्छींद्र नाईकनवरे यांनी फिर्यादीस घरी येऊन तुमच्या शेतातील ऊस पेटलेला आहे असे सांगितले.यावेळी फिर्यादीसह सर्वजण घरा शेजारचे 1)सुधीर सर्जेराव नाईकनवरे 2)धंनजय बाळु नाईकनवरे 3)राहुल सर्जेराव नाईकनवरे याना सोबत घेत ऊस पेटलेल्या शेतात पळत पळत गेले.
सदरचा ऊस हा वाडीकुरोली जमीन गट नंबर 114मध्ये असुन सदर गटातील सुमारे अर्धा एकर ऊस जळालेला आहे सदरचा ऊस हा शेतीच्या दक्षिण बाजुपासुन उत्तर साईटला सुमारे पाचशे फुट अंतरावर मध्यठिकाणी ऊस जळला आहे. सदरचा ऊस हा फिर्यादीच्या वस्तीवरील राहणारे कल्याण उत्तम काळे यांनी पेटवलेला असावा कारण फिर्यादीचे व त्याचे 5वर्षापुर्वी भांडण झाले होते त्या भांडणामध्ये तुझा ऊस पेटवुन देतो अशी धमकी कल्याण काळे यांनी फिर्यादीस दिली होती. त्याने आमचा ऊस मागचे वर्षीही फिर्यादीचा ऊस पेटवला होता त्यावेळी पोलीस स्टेशनाला तक्रार दिली नव्हती.
5महिन्यापुर्वी अनिता सुधीर नाईकनवरे हिच्याजवळ त्यांचे काहीतरी अर्थिक नुकसान करतो असे कल्याण काळे हा म्हणाला होता .सदरचा ऊस हा चालु गळीता करीता जाणारा सुमारे 15 ते 16 फुट उंचीचा असा ऊस कल्याण उत्तम काळे रा-वाडी कुरोली ता पंढरपुर यानेच मुद्दाम खोडसाळपणाने अर्थीक नुकसान व्हावे ह्या उद्देशाने सदरचा ऊस पेटवुन दिलेला आहे अशी फिर्याद तुकाराम नाईकनवरे यांनी दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago