गुन्हे विश्व

प्रियकराच्या मदतीने आईने केली ९ वर्षीय मुलाची हत्या

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आले आहे. सार्थक रमेश बागूल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२) अशी आरोपींची नाव आहेत.

वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी संगीता रमेश बागूल यांनी आपल्या मुलाची अपहरणाची नोंद केली होती.त्यामुळे पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहासोबतचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवताच संगीता यांनी आपलाच मुलगा असल्याचं सांगितले. पण ओळख पटली असली तरी खुनाचा आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना हा खून आईनेच केल्याचा संशय आला आणि त्यांनी आईला ताब्यात घेतलं असता, मुलाने आपल्याला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरू नयेत म्हणून,प्रियकर साहेबराव माणिकराव पवार याच्या मदतीने मुलाचा खून केल्याची कबुली दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago