फॅबटेकच्या दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या कंपनीमध्ये निवड

सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट बाबतीत अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक  इंजिनिअरिंग   कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील  दिपाली लेंडवे या विद्यार्थिनीची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून तिला वार्षिक 4.5 लाख रुपयाचे  पॅकेज मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे यांनी दिली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही  शेअर मार्केट  डेरीवेटिव मधील  जागतिक स्तरावर एक नंबर आणि इक्विटी मध्ये 4 नंबर क्रमांकावर   आहे , त्यामुळे अशा नामांकित  कंपनीमध्ये फॅबटेक कॉलेज मधील विद्यार्थ्यांना संधी मिळणे   हे फॅबटेक मधील तंत्र शिक्षणाची  गुणवत्ता दर्शवते असे  संस्थेचे  चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर  यांनी सांगितले.
 
   निवड झालेल्या या  विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, संचालक  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे,  फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडेमिक डीन प्रा . तात्यासाहेब जगताप, इलेक्ट्रॉनिक्स  इंजिनिअरिंग अँड टेली कम्युनिकेशनच्या  विभागप्रमुख  प्राध्यपिका धनश्री राऊत, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट  विभागाचे प्रमुख डॉ .साहेबागौडा संगनगौडर,  सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago